प्रतिनिधी – कुलदीप मोहिते, सातारा.
सध्या राज्यात मराठा आरक्षण विषयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे त्यात कोल्हापूरच्या मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रात्री उशिरा पत्र लिहले आहे. या पत्रात सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती ‘खराटाच’ येते असल्याचे म्हटले. तसेच सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा गर्भित इशारा पत्राद्वारे दिला आहे.
आरक्षणाचा ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीपासून कदापी मागे हटणार नाही..इतर समाजाबरोबर मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
चाळीस वर्षाचा काळ लोटला तरी मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे त्यामुळे आरक्षणाचा ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज या मागणी पासून मागे हटणार नाही.
मात्र हा निर्णय प्रत्यक्षात अमलात येईपर्यंत समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ सरकारने करावी जेणेकरून मराठा समाजाला तात्पुरता दिलासा मिळेल तेव्हां पुढची पावले उचलताना मराठा समाज आश्वस्त होईल अशी सरकारची भूमिका असती पाहिजे आतापर्यंत मराठा समाजाने खूप संयमाची भूमिका घेतली आहे म्हणून सरकारने त्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नये. न्यायमूर्ती भोसले समितीने ज्या काही बाबी सुचवल्या आहेत त्यानुसार तातडीने पुढची पावले उचलली गेली पाहिजेत सरकारने आता कुठलाही विलंब न करता येत्या 5 जुलैच्या आधी सर्व मागण्या मंजूर केल्याची घोषणा तात्काळ करावी अन्यथा मराठा समाजातून जो उद्रेक होईल त्याला सर्व लोकप्रतिनिधी आणि सरकारच जबाबदार असेल. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.