भरपूर लोक अशी असतात की ज्यांना व्यवसाय तर करायचा असतो पण कोणता करावा हा प्रश्न पडतो। आणि कधी कधी अस होत की एखादा व्यवसाय चांगला चालू असेल, तर आपल्याला वाटत की ह्या व्यवसाय ची कल्पना मला का नाही आली बरं।
त्या साठी आज मी असेच १० व्यवसाय ची माहिती तुम्हाला देणार आहे, जेणे करून तुम्ही कमीत कमी गुंतवणूक मध्ये जास्तीत जास्त फायदा कमवू शकता।
१. अंड्याचा होलेसले व रिटेल दुकान :

अंड्याचा शॉप हा एक कमी गुंतवणूक मध्ये सुरू होणार व्यवसाय आहे, आणि हा धंदा प्रत्येक वृतु मध्ये चालणार धंदा आहे। या धंद्या मध्ये तू छोटीशी गुंतवणूक करून तुम्ही ४०००० ते ५०००० आरामात एक महिन्यात कमवू शकता। हा व्यवसाय कोणताही माणूस सोप्या पद्धतीत करू शकतो।
२. स्टेशनरी शॉप :

तुम्हाला तर माहितीच असेल की स्टेशनरी शॉप हे किती चालतात, तुम्हाला या व्यवसायात गुंतवणूक थोडी जास्त करावी लागेल पण हा एक असा व्यवसाय आहे जो १२ ही महिने डिमांड मध्ये असतो। जर का तुम्ही तुमचा स्टेशनरी शॉप शाळा किंवा बसस्थानका समोर टाकलं तर ह्या व्यवसायातुन तुम्ही आरामात ८०००० ते रु. ९०००० कमवू शकता।
३. पतंजली शॉप :

जर का तुम्हाला जास्त डोक्याला तान नको असेल, आणि एक चांगल्या ब्रँड सोबत काम करायची इच्छा असेल तर तुम्ही पतंजली कंपनी ची फ्रांचायसी घेऊ शकता। आणि पतंजली ह्याचा जाहिराती टीव्ही वर येत असल्या मुळे आणि हा एक स्वदेशी ब्रँड असल्या मुळे लोक आपोआप दुकानात येतात आणि तुम्ही बसून पैसे कमावता।
४. कार आणि बाईक वॉशिंग सेंटर :

जर तुमचा काळे थोडीशी जागा आणि पाणी ची सोया असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। हा व्यवसाय इतका सोपा आहे की कोणी पण करू शकतो, आणि तुम्हाला तर माहितीच असेल की आज प्रत्येकाचा घरात गाडी आहे, त्या मुळे हा कायम चालणार धंदा आहे। टू-व्हिलर वॉशिंग चे रु.५० आणि कार वॉशिंग चे रु.३०० घेऊन तुम्ही चांगला नफा कमवू शकता।
५. पान शॉप :

कोणताही काम छोट नसत, तसेच तुमही एक छोटीशी पान पट्टी खोलू शकता, आणि ते पण खूप कमी पैश्यात। हा एकमेव धंदा आस आहे ज्याच्यात तुम्हाला दर वस्तू मागे ५ ते ८ रुपया चा नफा होतो, आणि त्या पैशातून तिमाही तुमचा पान चं शॉप वाढवू शकतात।
६. हेअर कटिंग / सलून :

ह्या धंद्यात तर फक्त तूमचा कळे कला पाहिजे आणि बाकी ह्या धंद्या ला खुप कमी खर्च येतो उभा करायला। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आज एक कटिंग चे रु.७० ते रु.१०० घेतात, आणि कटिंग चा खर्च कीती येतो (१ ब्लेड, १ कैची , १ वाटी , १ वस्तरा ) जास्तीत जास्त १०० रुपये। आणि हे रु.१०० तुम्ही खूप आरामात एका कटिंग मध्ये कडू शकता ,आणि बाकीचे उरलेले तुमचा नफा असेल।
७. बर्गर शॉप :

तुम्हाला माहिती नसेल पण एक बर्गर हा १० रुपयात बनतो आणि दुकानदार तो रु.५० ते रु.७० या किंमती मध्ये विकतो, जे की खूप जास्त नफा आहे, जर तुम्हाला ही असा एक बर्गर बनवायचं शिकायचं असेल तर तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता किंवा सोशल मध्यमा द्वारे शिकू शकता ,आणि त्या बर्गर मध्ये भरपूर व्हारेटीज ग्राहकांना देऊ शकता। त्या पद्धतीने तुमचा बर्गर हा एक ब्रँड होईल आणि लोक लांबून लांबून तुमचा बर्गर खायला येतील।
८. चहा दुकान :

जर का तुम्हाला माहिती असेल ,तर आज चहा चे दुकान कोणत्या ५ स्टार हॉटेल पेक्षा कमी नाहीत। तुम्ही जर का आज येवले चहा, किंवा, प्रेमाचा चहा, किंवा, खोमणे चहा, हे सगळे चहा चे ब्रँड आहेत। आज हे सगळे ब्रँड चहा विकून लाखो कमवत आहे। तर विचार करा आपण जर का एक टपरी उघडली आणि चांगल्या चविचा चा चहा ग्राहकांना बनवून पाजला, तर तुमचा चहा पण ब्रँड होऊ शकतो, ह्या व्यवसायात तुम्ही कमी खर्चात जास्त पैसे कामवू शकता
९. फळं स्टॉल :

तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही फळं विकायची गाडी एखाद्या मंदिरा सोमर किंवा दवाखान्या समोर टाकली तर तुमचा धंदा डबल होईल। जेवळे फळं तुम्ही एक रस्त्यावर विकत त्या पेक्षा जास्त फळं तुमचे इथे विकल्या जातील। आणि या व्यवसाया मध्ये जास्त खर्च ही येत नाही , तुम्हला फक्त फळं विक्रेता सोबत संबंध ठेऊन तुमचा व्यवसाय चालू ठेवायचा आहे।
१०. फॉर्म व तिकिट बुकिंग केंद्र :

जर का तुम्ही थोडे फार शिकले असाल किंवा तुमची ms-cit झाली असेल तर मग तुम्ही हे फॉर्म किंवा तिकिट बुकिंग केंद्र सुरू करू शकता। यात जास्त काही खर्च येत नाही, फक्त तुमचा कडे एक लॅपटॉप / कॉम्पुटर व इंटरनेट आणि तुमची स्किल, फक्त तुम्हाला लोक्कांचे फॉर्म भरायचे आहे आणि त्यांचा कडून पैसे घ्यायचे आहे। एक फॉर्म चे तुम्ही रु.१०० ते रु.१५० घेऊ शकता खूप उत्तम व्यवसाय आहे।
जर तुम्हाला हे वरती सांगितलेले व्यवसाय आवडले असतील तर तुम्ही हे तुमचा मित्रांना पण सांगू शकता आणि त्यांना पण बिझनेस बद्दल माहिती देऊ शकता।