केंद्र सरकारने नुकतीच 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. त्यानुसार 1 मे पासून हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 28 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
कोविन अँपवर ही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट कारणात आले आहे.1 मेपासून देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.
कोरोना लस घ्यायची असल्यास कशी करणार नोंदणी?
- कोविन पोर्टलवर https://selfregistration.cowin.gov.in/ आपला मोबाईल नंबर टाकून GET OTP (ओटीपी मिळवा) वर क्लिक करा व पुढील तपशील भरून नोंदणी करा.
- येथे आधारकार्ड / पॅनकार्ड/ पासपोर्ट /पेंशन बूक / मतदानकार्ड/ ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून
- तुम्हाला ओटीपी मोबाईलवर मिळेल, नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करा
- रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लसीकरणासाठी दिवस आणि वेळ ठरवू शकता
- हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही लस घेऊ शकता.
- यावेळी तुम्हाली रेफ्रन्स आयडी मिळेल, याच्या माध्यमातून तुम्हाला लस सर्टिफिकेट मिळू शकते.
टीप : रेजिस्ट्रेशनच्यावेळी तुमच्याजवळ आधारकार्ड / पॅनकार्ड/ पासपोर्ट /पेंशन बूक / मतदानकार्ड/ ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे.
आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन देखील लसीकरणाची नोंदणी करू शकता. लस डोस घेत असलेल्या लोकांना प्रमाणपत्र दिले जाते. आपण हे पोर्टलवर तयार केलेल्या आपल्या खात्यातून देखील डाऊनलोड करू शकता.