कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव (ता. कराड )येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली

< 1 Minutes Read

– कुलदीप मोहिते, कराड

कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष वि .तु. सुकरे गुरुजी, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, वसंत माटेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांच्या वतीने सुमारे 200 विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती देणारी पुस्तिका, पेन आदी शैक्षणिक साहित्य तसेच थंडीपासून विद्यार्थ्यांच्या त्वचेचे रक्षण व्हावे म्हणून आयुर्वेदिक क्रीम व खाऊ वाटप करण्यात आले. वि.तु.सुकरे गुरुजी म्हणाले, जयवंतराव भोसले हे दूरदृष्टी असणारे नेतृत्व होते.

कृष्णा उद्योग समूह त्यांच्या दुरदृष्टीची साक्ष देते. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले करीत आहेत. कार्यक्रमाला दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे सचिव एस टी सुकरे, प्राचार्य आर बी पाटील, कालवडे -बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते,हितेश सुर्वे, धोंडीराम शिंदे, संजय पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, अरुण पाटील, शिवाजी माळी, भगवान पाटील, अर्जुन माळी, रघुनाथ जाधव, प्रकाश रसाळ, सुनील शिनगारे, सोमेश्वर तलबार, विलास माटेकर, निवृत्ती माटेकर, ,अशोक शिंदे, रणधीर शिंदे, ,बाळासो नलवडे, गौरव कडोले, रोहित मुळीक आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, वसंत माटेकर, विलास माटेकर, बाळासाहेब नलवडे, रणधीर शिंदे, अनिकेत तांबवेकर, गौरव कडोले, रोहित मुळीक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *