दिनांक 25 मे उंब्रज( कराड) – प्रतिनिधी:कुलदीप मोहिते
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून 25 मे ते 1 जून पर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये कडक लॉक डाऊन लावण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंग व पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे, तरी पण काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत, म्हणून उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पाटण रोड वर जागेवरच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तपासणी धडक मोहीम करण्यात आली, यामध्ये एकूण ७ जणांची तपासणी करण्यात आली त्या मध्ये २ जन पॉझिटीव्ह आले.
यावरून कोरोना संसर्गाची तीव्रता आणि गंभीरता दिसून येते आणि लोकांचा निष्काळजीपणा यातून दिसून येतो, त्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे अंमलबजावणी व खबरदारी त्याने घेणे गरजेचे आहे तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान उंब्रज पोलीस स्टेशनच्या वतीने या वेळी करण्यात आले
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांची धडक कारवाई
< 1 Minutes Read