पुण्यातील घोटावडे फाटा येथे एका कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेत 7 ठार आणि 10 बेपत्ता

< 1 Minutes Read

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील उरवडे औद्योगिक वसाहतीतील 'एसव्हीएस' कंपनीला आज (ता.7) दुपारी भीषण आग लागली.10 कामगार बेपत्ता आहेत. आतापर्यंत 20 कामगारांना वाचविण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनविण्याचे काम सुरू होते. 

शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले होते. याशिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झाली होती. तर, बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी कंपनीची संरक्षक भिंत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली.पुण्यालगत कंपनीला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील उरवडे औद्योगिक वसाहतीतील 'एसव्हीएस' कंपनीला आज (ता.7) दुपारी भीषण आग लागली.  काही कामगार बेपत्ता आहेत. आतापर्यंत 20 कामगारांना वाचविण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनविण्याचे काम सुरू होते. 

या कंपनीत केमिकल तयार केले जात होते, या केमिकलमुळे  ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी कंपनीत ३७ कामगार होते. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारांचा शोध घेतला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *