भारतीय कंपन्या आणि त्यांची अनेकांना माहीत नसलेली नावे…

< 1 Minutes Read

बहुतेकदा आपण भारतातील कंपनी च्या नावाचे ब्रंडिंग असलेल्या वस्तु खरेदी करतो पण आपण कधी त्यांची खरी नावे जाणून घेण्याचा प्रयत्न नाही करत, चला तर मग आज आपण आशा कंपन्यांची नाव जाणून घेऊ ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात सतत येत असतात.

MRF,WIPRO,ITC,TVS,PVR ह्या कंपन्या आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या नावाचा पूर्ण अर्थ काय होतो किवा त्याचा संपूर्ण नाव काय आहे हे जाणून घेऊ.

1.


INDIAN TOBACCO COMPANY ( ITC )

पूर्वी ITC इम्पीरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात असे. 1970 मध्ये नाव बदलून इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड करण्यात आले. आयटीसीची स्थापना 1910 मध्ये झाली.

2.

PRIYA VILLAGE ROADSHOW (PVR)

पीव्हीआर सिनेमाची सुरवात Village Roadshow Limited 3 Priya Exhibitors Private Limited ने संयुक्तपणे एकत्रित येऊन केली. PVR ची स्थापना जून 1997 मध्ये झाली.

3.

WESTERN INDIA PALM REFINED OILS LIMITED (WIPRO)

पूर्वी कंपनी वेस्टर्न इंडिया पाम रिफाईंड ऑइल लिमिटेड म्हणून ओळखले जात असे. अलीकडे ते नाव बदलून वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट लिमिटेड केले आहे. कंपनीची स्थापना मो. हशम प्रेमजी यांनी 1945 मध्ये केली होती. त्यांच्यानंतर अझीम प्रेमजी यांनी विप्रोला यशोशिखरावर पोहचवले.

4.

THIRUKKURUNGUDI VENGARAM SUNDARAM (TVS )

टी. व्ही. सुंदरम अय्यंगार यांनी टीव्हीएस ग्रुपची स्थापना केली. आणि टीव्हीएस मोटर कंपनी त्यांचीच एक सहकंपनी आहे. टीव्हीएस ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची दुचाकी निर्माता कंपनी आहे.

5.

MADRAS RUBBER FACTORY ( MRF )

मद्रास रबर फॅक्टरीची स्थापना के. एम. मॅमेन मपिल्लई यांनी 1946 मध्ये तिरुवट्टीयूर, मद्रास (आताचे चेन्नई) येथे केली होती. सुरुवातीला Ballon (फुगे) आणि खेळणी बनवणारी MRF आज भारतातील सर्वांत मोठी टायर निर्माता कंपनी आहे.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *