सांगोला: इंजिनिअरींग कृती समिती, सोलापूर जिल्हा (सांगोला तालुका) युवक व युवती कार्यकारणी मार्फत आज मा. आमदार अँड.शहाजीबापु पाटील यांना निवेदन देण्यात आले. 21-06-2021 रोजी सोलापूर जिल्हा (सांगोला तालुका) पदाधिकारी यांनी आमदार. अँड.शहाजीबापु पाटील यांच्या सोबत चर्चा करून. विद्यार्थ्यांची अनावश्यक फी पुर्ण माफ करावी,तसेच ट्यूशन फी मध्ये 20% फी माफ व्हावी. याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.आमदार अँड शहाजीबापु पाटील यांनी मा.सांमत साहेबांसोबत बोलुन तसेच हा प्रश्न विधानसभेत मांडुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, निवेदन देताना यावेळी सांगोला युवक अध्यक्ष.अमोल जगताप, उपाध्यक्ष. सचिन नवले व विद्यार्थी. ओंकार कुलकर्णी तसेच युवती अध्यक्षा. धनश्री ताई सांळुखे, उपाध्यक्षा. अबोली ताई शास्ञी व अमृता ताई झपके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाविद्यालयातील अनावश्यक फी रद्द करा. इंजिनिअरींग कृती समिती मार्फत मा.आमदार अँड शहाजीबापु पाटील यांच्याकडे निवेदन…
< 1 Minutes Read