प्रचंड पैसा मिळवून देणारं झाड, पाहा कुठे आहे?

< 1 Minutes Read

आपण असे नेहमी म्हणतो की, पैसे काय झाडावर उगत नाही आणि ते बरोबर देखील आहे. पण पैसे जरी झाडावर उगत नसले तरी, झाडापासून जे आपल्याला मिळतं त्याचा वापर योग्य पद्धतीने केला, तर आपण त्याच्यापासून मालामाल होऊ शकतो हे मात्र नक्की आणि ही गोष्ट आफ्रिकेच्या लोकांनी सिद्ध केलं आहे.

आफ्रिकन देश युगांडामधील लोकं त्यांच्या भागात सापडलेल्या अंजीरच्या झाडाच्या सालीपासून कापडे तयार करतात. ते देखील साधे सुदे कपडे नाही
त्यापासून चक्कं फॅशनेबल कपडे बनवले जातात.

अंजीर झाडाच्या सालातून बनलेले डिझाइनर कपडे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. ज्यामुळे या कपड्याची आणि या सालीच्या फॅब्रीकला चांगलेच पैसे मोजले जातात. झाडाच्या सालीपासून बनवलेल्या कपड्याला बर्कक्लोथ असे म्हणतात. डोरीनही झाडाच्या सालीतून सुंदर लग्नाचे गाऊन देखील बनवते.

अंजीराच्या झाडाची साल काढल्यानंतर, यासालीला एका जटिल प्रक्रियेमधून जावे लागते. या झाडाच्या सालीतून, युगांडाची राजधानी येथे राहणारी डिझायनर डोरिन नामतोवू फॅशनेबल कपडे बनवते. झाडाच्या सालीपासून कपडे बनविणे ही प्राचीन युगांडाची कला आहे. येथे पारंपारिक कलेसह फॅशन उद्योगाला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कम्पाला ही युगांडाची राजधानी आहे. कम्पाला येथे अंजीरला मुतूबा बोलले जाते. झाडापासून साल काढल्यानंतर या सालीला काही वेळासाठी गरम पाण्यात
ठेवले जाते. ते गरम पाण्यात ठेवण्याचे कारण म्हणजे असे केल्याने झाडाची साल साफ करता येते. त्याचबरोबर साल ही मऊ होते.

त्यानंतर झाडाच्या सालीला लाकडी हातोड्याने मारले जाते. कित्येक तास या सालीला कुटल्यानंतर ती साल पसरते. त्यानंतर ही साल कपडा बनण्यासाठी
तयार असते. असे म्हटले जाते की, यामुळे येथील शेतकरी झाडे लावण्यासाठी प्रेरीत होऊन झाडे तर लावतील. त्याचबरोबर येथील अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागेल.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *