सगळीकडे एवढे निगेटिव्हिटी पसरली आहे. की प्रत्येकाच्या मनात एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे. लोकांच्या नोकऱ्या चालले आहेत. रोजगार बंद पडू लागले आहे. व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. एवढी सगळी नकारात्मकता असताना माणूस आनंदी राहू शकतो. असा तुम्हाला प्रश्न पडला असेल?
अशा निगेटिव वातावरणामध्ये स्वतःला कसा पॉजिटिव ठेवव त्याच्याबद्दल पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मला खात्री आहे निश्चितच या पाच गोष्टी तुम्हाला सुद्धा पॉझिटिव राहण्यासाठी मदत करतील.
- बातम्या पाहणे बंद करा.
सध्या लोक काय करत आहे सकाळ-दुपार- संध्याकाळ नुसते बातम्या बघत आहे. बातम्यांमध्ये फक्त कोरोना किती रुग्ण सापडले किती जणांचा मृत्यू झाला हे चालू आहे निसर्गाचा नियम आहे जे तुम्ही मनाला खाद्य द्याल त्याच प्रकारे तुमच्या मनामध्ये कल्पना भावना निर्माण होणार. हे सतत कोरणा च्या बातम्या बघून तुम्ही फक्त भीती काळजी चिंता टेन्शन यायला आमंत्रण देत आहे. त्यामुळे पहिले तुम्ही बातम्या बघायचे बंद करा किंवा कमी तरी करा. त्याऐवजी चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. चांगले आयुष्य बदलणारे विनोद बघा. तुमचा छंद जोपासा असे काहीतरी करा. ज्यामुळे तुमची एक तर प्रगती तरी होईल किंवा तुम्हाला आनंद तरी मिळेल. - “स्वार्थीपणा” फक्त आपला आणि आपल्या परिवाराचा विचार करा.
सध्या बाहेरची परिस्थिती किती भयावह आहे. हे मला तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांनी मित्रांनी कितीही त्यांच्या घरी बोलावले लग्नासाठी पूजेसाठी,जेवणासाठी, भेटण्यासाठी तर त्यांना सरळ नाही म्हणा. कोणाला काय वाटेल याचा विचार करू नका. कारण हा रोग कसा आहे ज्याला होतो तेव्हा त्याच्या बरोबर त्याची बायको किंवा नवरा सुद्धा नसतो. त्यामुळे सध्या स्वार्थीपणा स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. भेटी गाठी साठी पूर्ण आयुष्य पडले आहे. - गव्हर्मेंट, कोरोनाच्या लसीचा तुटवडा, भ्रष्टाचार, राजकारण या विषयांवर चर्चा करणे बंद करा
या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. त्यावर चर्चा करून आपण काय सिद्ध करणार आहोत व्हाट्सअप वर फेसबुक वर सध्या अनेक मेसेज करत असतात की सरकारचे कसे चुकते. कसा भ्रष्टाचार चालू आहे. तसेच राजकारण चालू आहे .वगैरे वगैरे आणि गमतीची गोष्ट म्हणजे इथे मित्र मित्र एकमेकांबरोबर भांडत बसतात .त्या चर्चा करून काही फायदा होणार नाही. कारण ह्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही. ही या गोष्टींबद्दल चर्चा भांडणे करणे बंद करा. मी इथे असे म्हणत नाही की चुकीच्या गोष्टींबद्दल बोलू नका. त्या बोलल्या पाहिजे पण योग्य ठिकाणी येथे व्हाट्सअप वर फेसबुक वर वाद घालून आपण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. - सध्या महागड्या न लागणाऱ्या वस्तू विकत घेऊ नका
जसे मी सांगितले लोकांच्या नोकऱ्या चालले आहेत रोजगार बंद पडत चालले आहे त्यामुळे न लागणाऱ्या महागड्या वस्तूंची खरेदी करू नका जसे की मोबाईल फोर व्हीलर फर्निचर मागणी कपडे कर्ज कारण भविष्यकाळ कसा असेल आपल्याला माहित नाही अशा वेळेस आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणे गरजेचे आहे कारण कितीही जवळची व्यक्ती असली तरी वेळ आल्यावर ती सुद्धा पाठ फिरवते त्यामुळे खर्च विचार करुन करा. - नवीन नवीन स्किल्स शिका स्वतःची किंमत वाढव
कोणतीही गोष्ट कायम स्वरूपी कधीच राहत नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे. सध्या कितीही नकारात्मकता पसरली असली. तरीही काही कायमस्वरूपी राहणार नाही. हे जग पूर्व पदावर नक्की येणार याची खात्री आहे . त्यावेळी तुमची मार्केट मध्ये काय किंमत असणार आहे. हे सर्वस्व तुमच्याकडे कोणत्या स्किल्स यावर अवलंबून असणार आहे . त्यामुळे सध्या रिकामा वेळ असेल तर नवीन नवीन स्किल्स शिका . तुमच्या फील्ड मधले कोर्सेस करा. स्वताला अपडेट करत रहा. आजच्या काळात स्किल्स ला खूप महत्व आहे .