मुंबई रेव्ह पार्टी प्रकरण: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एका रेव्ह पार्टीमध्ये केलेल्या छाप्यादरम्यान अटक केली आहे. मुंबई-गोवा क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीशी संबंधित ड्रग्स प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना अटक करण्यात आली आहे.
NCB च्या अधिकाऱ्यांना मुंबईहून गोव्याच्या क्रूझवर रेव्ह पार्टीबाबत टीप मिळाली होती. ज्याच्या आधारे NCB ने ही कारवाई केली. या छाप्यादरम्यान दोन महिलांसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.
मीडिया रिपोर्टनुसार, एनसीबीचे अधिकारी प्रवासी म्हणून क्रूझवर आले होते आणि त्यांनी रेव्ह पार्टीचा भांडाफोड केला.