Ayurvedik Hair Fall Treatment
आयुर्वेदानुसार केस आणि नखं हे अस्थि धातूपासून निर्माण झालेले घटक आहेत .
अर्थातच केसांचे आणि नखांचे आरोग्य हाडांच्या आरोग्याशी निगडीत आहे .
प्रत्येकाच्या जन्मजात प्रकृतीवर केसांची लांबी, वाढ, चमक इत्यादी अवलंबून असते.

वात प्रकृती : कोरडे, विरळ, भुरकट,फाटे फुटणारे, कुरळे, फार वाढ नसणारे केस.
पित्त प्रकृती : चमकदार,मऊ, मध्यम घनता, सोनेरी किंवा तांबूस, लवकर पांढरे होण्याकडे कल, तेलकट, असणारे केस .
कफ प्रकृती : दाट,काळे, लांब, मऊ, चमकदार केस.
मिश्र प्रकृती : असल्यास मिश्र लक्षणे असतात .
ऋतू, हवामान, व्यवसाय, आहार, झोप , या सर्वांचा केसांवर परिणाम दिसून येतो .
औषधींनी सिद्ध केलेल्या तेलांच्या मालिशने केसांचे आरोग्य सुधारते; मात्र तेवढेच पुरेसे नाही!! बाह्य औषधींचा/ प्रसाधनांचा उपयोग तात्पुरता दिसतो. वारंवार वेगवेगळी तेले, शांपू, जेल यांचा वापर केल्याने केसांना फायदा होण्यापेक्षा नुकसानच होऊ शकते !
मुख्य गरज असते; समतोल आहार, योग्य झोप, निरोगी मानसिक स्थिती, इत्यादी गोष्टींची !
Hair Fall Treatment
आयुर्वेदानुसार शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यातील अस्थि,दात, केस आणि नखं हे पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूताचे अधिक्य असणारे घटक !!
कोणत्याही कारणांमुळे शरीरातील वात किंवा पित्त म्हणजे , कोरडेपणा, उष्णता, इ. वाढल्यामुळे या घटकांना हानी पोहोचते।
आबालवृद्ध, स्त्री – पुरुष सर्वांनाच केस सुंदर, चमकदार, दाट, असावेत, असे वाटणे स्वाभाविक आहे !! सध्याच्या जाहिरात युगातील सौंदर्याच्या मापदंडामुळे तर ही आवश्यकता बनली आहे !
विरोधाभास मात्र असा की, दिवसेंदिवस केसांच्या तक्रारींचे प्रमाण वाढतच चालले आहे !
एखाद्याला टक्कल पडू लागले की केसांबरोबर त्याचा आत्मविश्वासाचा ‘काऊंट’सुद्धा कमी होतो. दाट केस हे तारुण्याचे लक्षण मानले जाते. दररोज ५० ते १०० केस गळणे हे सामान्य समजले जाते. याचे कारण म्हणजे केसांच्या वाढीच्या सायकल प्रमाणे हेच केस साधारण १०० दिवसांनंतर पुन्हा उगवतात.
वयोमानाप्रमाणे व्यक्तीचे केस काही प्रमाणात विरळ होत जातात.
केसगळतीची प्रमुख कारणे
- १. अनुवांशिकता
- २. वजन कमी करण्यासाठी केलेले असंतुलित डायटिंग
- ३. गरोदरपणा, प्रसूती किंवा रजोनिवृत्तीमुळे हॉर्मोनमध्ये होणारे बदल.
- ४. शरीरातील अनेक हॉर्मोनच्या पातळीवर केसांची वाढ निर्भर असते. थायरॉइड, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन हे त्यातील काही महत्त्वाचे घटक आहेत.
- ५. काही औषधे जसे कर्करोग, आर्थरायटिस, नैराश्य, हृदयविकार, आदींवर वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे
- ६. शारीरिक किंवा मानसिक धक्का
- ७. काही अशा ‘हेअर स्टाइल’ ज्यामध्ये केस ताणून बांधले जातात
- ८. केसांना वारंवार स्ट्रेटनिंग अथवा कुरळे करणे
- ९. ताण-तणाव, प्रदूषण
- १०. असंतुलित आहार
- ११. विविध प्रकारची व्यसने
- १२. विचित्र हेअर स्टाइल्स करण्याचा अट्टाहास
- १३. क्षारयुक्त पाण्याचा किंवा केमिकल्सचा वारंवार वापर
- १५. झोपेच्या अनियमित वेळा
Ayurvedik Hair Fall Treatment
एखाद्या व्यक्तीच्या केस गळण्याच्या कारणांचे एकच कारण नसते.
व्यक्तीची प्रकृती, डोक्याची त्वचा, केसांची घनता, व्यक्तीचा आहार- विहार, इत्यादींचा सविस्तर अभ्यास करून आयुर्वेदिक उपचार सुचवणे शक्य असते !
केसांच्या तक्रारी बऱ्याच शारीरिक बिघाडांमुळे लक्षण म्हणून दिसतात !! सध्या शरीरातील कोरडेपणा व उष्णता यामुळे होणारे केसांचे विकार अधिक प्रमाणात आढळतात.
उपचार करताना सखोल विचार व परीक्षण करूनच केसांची चिकित्सा करावी लागते. एकाच प्रकारचे तेल किंवा औषधे सर्वांनाच उपयुक्त ठरतील असे नाही !!
ज्याप्रमाणे झाडांच्या वाढीसाठी मुळांतून औषधे द्यावी लागतात; त्याचप्रमाणे केसांच्या तक्रारींसाठी पोटातून घेतलेली औषधे, आहार विहार यांमध्ये केलेला बदल, व जीवनशैलीत सुधारणा हे तेल, शांपू, प्रसाधने इत्यादीं पेक्षा अधिक उपयोगी ठरते !!

चाई पडलेल्या, केस विरळ झालेल्या, अनेक रुग्णांना योग्य आयुर्वेदिक उपचारांनंतर मुळापासून केस येतात !!
अर्थातच या उपचारांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो !!
खाण्यात अधिक मीठ /सोडा इत्यादी , किंवा बोअरवेलचे पाणी वापरल्यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे अगदी लहान वयापासून केस पांढरे होऊ शकतात !! मुळापासून पांढरे झालेले केस पुन्हा काळे करणे शक्य नाही ! मात्र आणखी केस पांढरे होऊ नयेत म्हणून उपचारांचा उपयोग होतो !
केस म्हटले की वैद्यांच्या डोळ्यापुढे सर्वात प्रथम येणारे औषध म्हणजे आवळा !!
हे बहुगुणी औषध तिन्ही दोषांचे शमन करते. शरीरातील पचन व रक्ताची गुणवत्ता सुधारते! शरीरातील अवाजवी उष्णता व कोरडेपणा कमी करणारा आवळा केसांच्या तक्रारींमध्ये बाह्य उपयोगासाठी, तसेच पोटातून घेतल्यास उपयुक्त ठरतो !
Solutions on Hair Problem
बाजारात विविध कंपन्या “आमला ज्यूस” विकतात!!
परंतु हा टिकवण्यासाठी त्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह घालणे अनिवार्य असते !
आवळ्याच्या सीझनमध्ये, ताजे आवळे घेऊन घरी रस बनवून घेतला, तर तो अमृतासमान परिणाम करतो !!
वर्षभर आवळे उपलब्ध नसतात. म्हणून सीझनमध्ये आवळ्याचे चूर्ण घरी बनविल्यास वर्षभर त्याचा उपयोग करता येईल .
आवळा कॅंडी हा एक लोकप्रिय पर्याय आहे. फक्त त्यामध्ये अवाजवी साखर जाते हे लक्षात ठेवावे !

घरी बनवलेला आवळ्याचा मोरावळा किंवा साखरांबा उपयुक्त ठरू शकतो !!
आवळ्यापासून अनेक औषधी कल्प बनवले जातात. त्यातील सर्वोत्तम औषध ते म्हणजे च्यवनप्राश !!
केश तेल किंवा केशधावन इत्यादी बाह्य औषधींमध्ये देखील आवळा हा प्रमुख घटक आहे .
सध्या हर्बल कॉस्मेटिक उत्पादनांची लाट आली आहे .
आमला ऑईल, आमला शांपू, असे असंख्य प्रकार बाजारात दिसतात ! यामध्ये अगदी कमी प्रमाणात (१ ते २ टक्के इतक्याच) औषधाचा अर्क वापरला जातो. उत्पादने वापरताना त्यातील औषधांचे प्रमाण महत्त्वाचे असते.
योग्य आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेली तेले किंवा बाह्य प्रसाधने आवर्जून वापरावी
आवळा हे महत्त्वाचे रसायन औषध आहे .ज्यांना केसांच्या, वाढलेल्या पित्तामुळे होणारे रोग, आणि डोळ्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी, आणि होऊ नयेत म्हणूनस्वस्थ असलेल्या आबालवृद्धांनी याचे सेवन केल्यास केसांची गुणवत्ता १०० टक्के सुधारते* !
Ayurvedik Hair Fall Treatment
Read This Also”
10 दिवसांत 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान
पुण्यातील उष्मायन केंद्रात मोराचा जन्म
महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडात वाढ