‘आज तक’ चे अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन

< 1 Minutes Read

नवी दिल्ली: ‘आज तक‘ या हिंदी न्यूज चॅनलचे अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे देशभरातील पत्रकरांनी शोक प्रगट केला आहे.

रोहित सरदाना २०१७ मध्ये झी न्यूज सोडून ते आज तक वृत्तवाहिनीमध्ये रुजू झाले होते. सध्या ते ‘दंगल’ या डिबेट शो चे सूत्रसंचालन करत होते. रोहित सरदाना हे टीव्ही पत्रकारीतेच्या क्षेत्रातील एक मोठे नाव होते.

वेगवेगळ्या प्रसिद्ध वृत्त वाहिन्यांवर त्यांनी अँकर म्हणून काम केले होते. स्टुडिओमधून अँकरिंग करताना थेट जनसामान्यांच्या प्रश्नाला हात घालून नेत्यांना बोलते करण्याची कला रोहित सरदाना यांना अवगत होती. त्यांचे अकाली निधन पत्रकारीतेच्या क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे. झी मीडियामध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केले आहे. ‘ताल ठोक के’ हा त्यांचा लोकप्रिय डिबेट शो होता.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *