शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धाराशिव (उस्मानाबाद) समन्वयक पदी ॲड.कानतोडे

< 1 Minutes Read

प्रतिनिधी:राम जळकोटे,उस्मानाबाद.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण पर्यटन मंत्री मा.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे नगरविकास/सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री.एकनाथजी शिंदे व डाॅ.श्रीकांत शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मा.मंगेशजी नरसिंह चिवटे यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा समन्वयक पदी ॲड.कानिफ राजेंद्र कानतोडे यांची करण्यात आली आहे,या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष्याच्या माध्यमातून गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रुग्णालयात किंवा ग्रामीण भागांमध्ये राखीव खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे,निकषात बसत असलेल्या गरजू रुग्णांना पूर्णत: मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,

गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाचे असल्यास गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी,मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी,श्री सिद्धिविनायक सहायता ट्रस्ट,टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्ट च्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन मुख्य कार्यालय किंवा कोपरी येथील वंदनीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू रुग्णांना सहकार्य करणार असून कोणताही दुजाभाव केला जाणार नाही,असे नवनिर्वाचित शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा समन्वयक ॲड.कानिफ राजेंद्र कानतोडे यांनी सांगितले.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *