देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला भारत देश सोडून थेट लंडनला निघून गेले आहेत.
द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. तसेच यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय.
आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत. अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.अदर पुनावाला म्हणाले, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे.
हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. यांना धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे.”दरम्यान दोन दिवसांपूर्वीच :गृह मंत्रालयाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला यांना वाय श्रेणी (Y Category) संरक्षण दिलं होत. गृह मंत्रालयाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. अदार पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इंस्टिट्यूट सध्या भारतात कोरोनावरील वॅक्सीन पुरवत आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगात सीरमकडून वॅक्सीन पूरवली जात आहे.
अदर पुनावाला यांनी विदेशात शिक्षण पूर्ण केलं. भारतात आल्यावर त्यांनी आपले वडील गासाइरस पुनावाला यांच्या उद्योगात काम करण्यास सुरवात केली आणि लवकरच त्यांनी कंपनीच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळली.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला उच्च स्तरावर नेण्यात अदर पुनावाला यांचे मोठे योगदान आहे. देशाती दिग्गज व्यक्तींमध्ये अदर पुनावाला यांचा समावेश होतो. पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे १०० एकर परिसरात उभारले गेले आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना कोणत्या शक्तिशाली लोकांची तसेच मुख्यमंत्रांची धमकी …. अदर पुनावाला थेट लंडनला रवाना.
< 1 Minutes Read