आयपीएलच्या 14 व्या पर्वावर कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. परंतु, आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
याचामुळे आज सोमवारी होणारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली होती. पण बायो बबलमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोरोना झाला नव्हता. परंतु, आता स्पर्धा सुरू असताना प्रथमच बायो बबलमधील खेळाडूंना कोरोना झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोलकाता संघातील दोघा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, थोड्या प्रमाणतात दिलासादायक गोष्ट म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.दरम्यान, वरुण आणि संदीप यांची टेस्ट पॉझिटीव्ह झाल्याने आरसीबीच्या संघात काळजी वाढली आहे. यामुळेच ही लढत पुढे ढकलण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले.