सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या 5 मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तशी घोषणाच केली आहे.
आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. जयंत पाटील यांनी ट्विट करून या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.