केंद्र प्रमुख दिलीप शिंदे यांच्या उत्कृष्ठ लेखणीच्या माध्यमातून भोसलेवस्ती शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या.

< 1 Minutes Read

प्रतिनिधी: राम जळकोटे-उस्मानाबाद.

औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम सुरू केला नि या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद उस्मानाबाद चे अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी सुंदर माझे गाव, सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम सुरू केला त्याचाच एक भाग म्हणून तांदूळवाडी केंद्रांतर्गत भोसलेवस्ती शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. परंडा तालुक्यातील तांदूळवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख दिलीप शिंदे यांनी तब्बल १० दिवसाचे अथक परिश्रमाने व्हरांड्यासह दोन्ही वर्ग खोल्यांचे रंगकाम पूर्ण केले आहे,हे करत असताना इयत्ता पहिली ते चौथीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांतील सर्व वर्गांचे मुळ संबोध आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती निवडून सुंदर हस्ताक्षरातील सुविचार, चित्र युक्त चार्ट,पाढे, भौमितिक आकार महाराष्ट्र-जिल्हा नकाशे, कालचक्र, शिवाजी महाराजांचा जीवनपट इत्यादि विद्यार्थी उपयुक्त माहिती शाळेच्या भिंतीवर रेखाटली गेली आहे.

त्यामुळे शाळेच्या भिंतीही आता बोलू लागल्या आहेत . केंद्र प्रमुख ब-याच अंशी शाळा व शिक्षकांना मार्गदर्शन करतात किंवा उणिवा शोधताना दिसतात परंतू केंद्र प्रमुख दिलीप शिंदे यांनी याला फाटा देत भोसलेवस्ती शाळेचे सहशिक्षक किरण बनसोडे यांना सोबत घेऊन स्वत: जातीने शाळा रंगरंगोटी साठी परिश्रम घेतल्याने शाळेच्या भिंतीही आता बोलू लागल्या आहेत. केंद्र प्रमुख शिंदे यांनी शाळा रंगरंगोटी करून कामाचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे,याचस्तव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी मगर, मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत यांचे हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला यावेळी किरण बनसोडे, प्रहार जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, परंडा तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे, तालुका नेते लक्ष्मण औताडे आदी.शिक्षक उपस्थित होते.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *