मागील काही दिवसानपूर्वी Whatsapp Privacy Policy मध्ये होणारा बदल आणि त्याद्वारे युजर्स चा डेटा Whatsapp कडे जाणार आणि युजर्सची Privacy धोक्यात येणार अशा प्रकारच्या बातम्या आपण सर्वांनीच वाचल्या होत्या .
Whatsapp वापरणे बंद करावे लागणार म्हणल्यावर आणि Privacy धोक्यात येणार असे चर्चेला विषय समोर आल्यानंतर Whatsapp ने असे काहीही होणार नसल्याचे सांगितले होते.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा Whatsapp नवीन Privacy Policy स्वीकारण्यासाठी युजर्सना नोटिफिकेशन पाठवत आहे. ही पॉलिसी स्वीकारली नाही तर, अनेक सेवा वापरताना युजर्सना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोणत्या राज्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात ते आपण पाहूया.
प्रायव्हसी पॉलिसी मध्ये केलेले मॉडिफिकेशन स्वीकारले नाहीत तर व्हॉइस कॉल स्वीकारणे किंवा करणे, त्याचबरोबर व्हिडीओ कॉलिंग करणे किंवा स्वीकारणे, यासारख्या सुविधा देखील मिळवणे अवघड होऊ शकते. त्याचबरोबर युजर्सना चॅट लिस्ट बघणे देखील कठीण जाणार आहे. तुमचे कॉन्टॅक्ट Whatsapp मध्ये दिसणे अवघड होऊन बसू शकते.
याच बरोबर तुम्हाला कोणी मेसेज केले आहेत, किंवा कॉल केले आहेत, याची माहिती देखील तुमच्या Whatsapp वर दिसणे कठीण होऊ भुकते. हे सगळे टाळायचे असेल तर, Whatsapp नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारणे गरजेचे होणार आहे.
Whatsapp लगेच वापरणे बंद होणार नसून काही काळासाठी Whatsapp तुम्हाला नोटिफिकेशन पाठवत राहील जर तुम्ही स्वीकारले नाही तर, आजपासून म्हणजे 15 मे नंतर अनेक जणांना अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळे पुन्हा एकदा युजर्सचे प्रायव्हसी आणि त्यांचा डेटा जो कंपनी आपल्या यूजर्सचा वापरणार आहे. हा सगळा विषय ऐरणीवर आला आहे. युजर्सचा डेटा वापरुन व्यापार करण्याच्या Whatsapp या नव्या धोरणाला सगळीकडून विरोध होत आहे.