“एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी”
प्रतिनिधी : कुलदीप मोहिते, सातारा.
सातारा : छत्रपती मराठा साम्राज्य ( cms) ग्रुप नेहमीच समाज कार्यात अग्रेसर राहिला आहे. कोरोना महामारी च्या काळामध्ये त्यांनी केलेली कामगिरीही प्रशंसनीय आहे. मग ते कोरोना रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे, प्लाजमा देणे असो वा जिल्ह्यामधील विविध ठिकाणी ब्लड कॅम्प घेणे अशा विविध सामाजिक कार्य मधून छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप हा आपला ठसा उमटवत आला आहे.
यावेळी निमित्त होतं दिवाळीचं छत्रपती मराठा साम्राज्य (cms) सातारा परिवारातर्फे दीपोत्सव सोहळा मराठ्यांची पाचवी राजधानी सातारा मधील शिवतीर्थ पो वई नाका सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर “एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी” या ब्रीद वाक्य खाली दि. 5/11/2021 वार शुक्रवार रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती मराठा साम्राज्य सातारा,(cms) परिवारातर्फे शिव तीर्थाच्या आजूबाजूची साफसफाई करण्यात आली. फुलाची रांगोळी काढण्यात आली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून 1001 दिवे लावण्यात आले सर्व बुरुजांवर 200 ज्योत तेवत ठेवण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी बलिदान देणारे अगणित मावळे यांचे स्मरण करून साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांना मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी अक्षरशः शिवतीर्थ दुमदुमून निघाला. अक्षरशहा हा नयनरम्य नजारा सातारकरांनी डोळ्यात साठवून ठेवला.

छत्रपती मराठा साम्राज्य(cms) सातारा. परिवार. आयोजित दीपोत्सव सोहळ्यास ओंकार देशमुख, बाबा जाधव, दीपक माने ,दत्ता शिंदे,योगिता घाडगे ,अमृत शिंदे, कैलास बाकले,शुभम महामुलकर,सूर्यकांत मोहिते,अतुल भोसले , सागर शेळके ,नानासाहेब गायकवाड ,आनंद गुळुमकर, अक्षय गाढवे, शेखर शिंदे ,गणेश कालंगे ,जागृती शिंदे,साईनंद कदम, वनिता भोसले ,दीपक शिंदे ,प्रियांका साबळे,सुष्मा पवार,प्रत्यक्ष उपस्थित होते . तसेच छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप सातारा परिवारातील बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.