😷 कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला चांगलेच हैराण केले. देशभरात संक्रमण वाढलेले होते तरीदेखील, राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.
💁🏻♀️ दुसरी लाट ओसरून गेल्यानंतर सुटकेचा निश्वास आपण सोडलेला असला तरी, राज्याने नेमलेल्या टास्क फोर्स मधील तज्ञांचे मात्र वेगळेच मत आहे.
◼️ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य किती प्रमाणात तयार आहे याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
🔹 डेल्टा प्लस हे दुसऱ्या लाटेत कोरोनानं बदललेलं नवं रुप आहे. हे रूप जास्त धोकादायक आहे.
😓 नियम पाळले गेले नाहीत तर; येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ℹ️ तिसऱ्या लाटेत रुग्णवाढ होण्याची शक्यता
😥 ‘कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत कोरोनाचे 8 लाख सक्रिय रूग्णही दिसू शकतात, ज्यांपैकी त्यात 10 टक्के मुलांचा समावेश असू शकतो.’ असे मत टास्क फोर्स मधील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.