पुणे : डेक्कन क्वीनच्या व्हिस्टाडोम कोचची पहिली धाव हाऊसफुल्ल,प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. व्हिस्टाडोम कोच 15 ऑगस्ट 2021 पासून मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला जोडला जात आहे. हा डबा 16.8.2021 लाही हाऊसफुल्ल आहे.
व्हिस्टाडोम कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, विशेषतः पावसाळ्यात घाटांची दृश्ये रुंद खिडक्यांसह अनुभवता येतात. Coach 75 व्या स्वातंत्र्यदिनी जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला आहे. त्याबद्दल प्रवाशांच्या वतीने रेल्वेचे आभार .
प्रवाशांच्या मोठ्या मागणीमुळे, मुंबई -पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच 15.8.2021 पासून डेक्कन क्वीन स्पेशल ट्रेनला जोडला गेला आहे. सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेष रेल्वेने या मार्गावर पहिला व्हिस्टाडोम कोच 26.6.2021 पासून चालू केला होता.