शरद पवारांचे दिल्लीतील निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी 4 वाजता 15 राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. यासाठी ’समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
या बैठकीमुळे कॉंग्रेस आणि भाजप यांना दूर सारून देशात तिसरी आघाडी स्थापन होऊ शकते का? काय असेल शरद पवारांचा आगामी निवडणुकीसाठी प्लान यावर जोरदार चर्चा सुरु आहे. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल असं विश्वासाने सांगू नाही शकत . सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, तिसऱ्या आघाडीची कुठलीच भूमिका नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल यावरही आपला विश्वास नाही”, असं प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर हे गेल्या काही दिवसात शरद पवारांना दुसऱ्यांदा भेटले आहेत. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीमुळे युपीए चे भवितव्य आणि देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरून या बैठकीत मोठी चर्चा आणि मोटबांधणी होणार असल्याचे बोलले जात आहे.