Warren Buffett जगातले सहावे श्रीमंत व्यक्ती आहे. 2021 च्या आराखड्यानुसार त्यांची संपत्ती 100 बिलियन डॉलर्स म्हणजे 7 लाख करोड पेक्षा जास्त आहे. Warren Buffett यांनी अकरा वर्षांची असल्यापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी 9800 डॉलर्स कमावले होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी पहिला इन्कम टॅक्स भरला. Warren Buffett यांना पैशाचे लोहचुंबक म्हणतात कारण त्यांना पैसे स्वतःकडे कसे आकर्षित करायचे याचे कौशल्य माहिती आहे. लहानपणापासून त्यांनी बराच वेळ हात घातला होता चिंगम विकणे ,कोको कोला विकणे, सायकलवर पेपर विकणे, त्यांनी एका सलून दुकानासमोर एक पिन बोल मशीन लावले होते.जे लोकं केस कापायचे त्यांच्याकडे असल्यामुळे पिन बोल मशीन खेळून स्वतःचे मनोरंजन करायचे आणि Buffett यांना पैसे मिळण्याची असे पैसे कमवत कमवत त्यांनी एका मशीन निवडून तीन मशीन बनवल्या नंतर त्यांनी काही कारणास्तव हा बिझनेस दुसऱ्याला चांगल्या किमतीत विकला असे पैशाची लोहचुंबक असलेल्या वॉरन बफे यांचे पैशाची पाच नियम खाली दिलेले आहेत.
- नेहमी डिस्काउंट मागणे.
- एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका
- पैसे वाचवा आणि कर्ज घेणे टाळा
- नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा
- आधी पैसे गुंतवा आणि मग खर्च करा
1.नेहमी डिस्काउंट घ्या
पहिला नियम: नेहमी डिस्काउंट मागा , ज्या वेळेस तुम्हाला कोणती गोष्ट विकत घ्यायचे असते त्यावेळेस ती डिस्काउंट मध्ये म्हणजेच सवलतीमध्ये घ्या मग मी नेहमी वस्तू घेताना डिस्काऊंट कुपन चा वापर करता किंवा मोठा सेल लागला असेल तिथून ते विकत घेतात. आणि असे करायला त्यांना अजिबात लाज वाटत नाही. एवढेच नाही तर अनेक कोट्याधीश लोकसुद्धा वस्तू विकत घेताना डिस्काउंट मध्ये घेतात Buffett म्हणतात ज्या वेळेस तुम्ही एक रुपया वाचवता त्यावेळेस तुम्ही एक रुपया कमावताना. एवढेच नाही तर अनेक कोट्यधीश लोक गोष्टी डिस्काउंट मध्ये विकत घेत असतील तर आपल्याला सुद्धा वस्तू डिस्काउंट मध्ये घेतल्या पाहिजे. डिस्काउंट नसेल तर डिस्काउंट वाट बघा आणि नंतर ते वस्तू घ्या. कारण सनसुधी मध्ये हमखास डिस्काउंट ऑफर मिळता
2.एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका
दुसरा नियम: एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका. गुंतवणूक करून दुसरा उत्पन्नाच्या पर्याय निर्माण करा सामान्य लोक फक्त एका अटीवर किंवा व्यवसायावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या घरचे सगळे पैसे पहिल्या आठवड्यात संपून जातात आणि मग ते पुढच्या महिन्याच्या पगारावर अवलंबून असतात
आजच्या महागाईच्या जमान्यात उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करणे जरुरी आहे तर लहान मुलांची टूशन घेणे, भांडे घेणे घेणे , सुट्टीच्या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन शिकवने किंवा चांगली गुंतवणूक करून त्याच्यावर व्याज मिळवणे. आज ऑनलाइनच्या जमान्यात passive income बरेच माध्यम उपलब्ध आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला एकदाच काम करावे लागते आणि नंतर ते केलेले काम तुम्हाला पैसे कमवून देते. जसे की वेबसाइट काढून ब्लॉग लिहिणे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे, पुस्तके लिहिणे ,यूट्यूब चैनल चालू करणे ,असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत .
3.पैसे वाचवा आणि कर्ज घेणे टाळा
तिसरा नियम: पैसे वाचवा आणि कर्ज घेणे टाळा. Warren Buffett यांना एकदा कुणीतरी प्रश्न विचारला लोक पैशासंदर्भात सगळ्यात मोठी चुक कोणती करतात? तर त्याने उत्तर दिले की लोक कमी वयात गुंतवणूक करायचे टाळतात आणि महत्त्वाचं म्हणजे गुंतवणुकीची सवय लावून घेत नाही. आणि दुसरा म्हणजे लोकं उधारीवर जीवन जगण्यात धन्यता मानतात. जसे की क्रेडिट कार्ड चे हप्ते अनावश्यक वस्तु साठी कर्ज घेणे जसे की महागडा मोबाईल, महागडे घड्याळ,महागडी कपडे, महागड व्हेकेशन एतर
दोन प्रकारचे कर्ज असतात चांगले कर्ज ,वाईट कर्ज . Warren Buffett यांचा साधा नियम आहे. शक्यतो टाळा आणि पैशाची गुंतवणूक करा.
4.नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा
चौथा नियम: नेहमी लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करा. मित्रानो आजकाल लोकांना श्रीमंत व्हायचे असते आणि या झटपट श्रीमंतीच्या नादात ते अनेक चुकीचे निर्णय घेऊन बसतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वॉरेन बफे यांनी आपली 99 % संपत्ती वयाच्या 50 व्या वर्षानंतर कमवली त्यांची 50 व्या वाढदिवशी संपत्ती 300 मिल्लियन डॉलारस होती. पण नंतर खनिज संपत्ती 72 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त झाली. ज्या वेळेस तुम्ही गुंतवणूक कराल ती दीर्घकालीन असू द्या. कारण त्याच्यामध्ये जोखीमदारी कमी असते आणि तुम्हाला मोबदला सुद्धा चांगला मिळतो.
5.आधी पैसे गुंतवा आणि मग खर्च करा
पाचवा नियम : आधी पैसे गुंतवा आणि मग खर्च करा , Warren Buffett म्हणतात तुमच्या ज्यावेळेस पगार येतो किंवा तुमच्या व्यवसायाला नफा येतो त्यातील आधी पैसे गुंतवा आणि मग उरलेल्या पैशांमधून तुमचा खर्च करा. पण बऱ्याच लोकांचे असे आहे की पैसे आले तिथे खर्च करतात. अनावश्यक गोष्टींसाठी काढलेले कर्ज चुकवता आणि मग थोडेफार पैसे उरले तर ते गुंतवतात आणि माझा असा अनुभव आहे म्हणूनच लोकांकडे पैसे गुंतवायला शिल्लक राहत नाही त्यामुळे आपण आधीच ठरवले की पैसे आले की मी ठराविक रक्कम गुंतवणार कारण गुंतवलेली रक्कम तुम्हाला भविष्यामध्ये श्रीमंत बनवेल.