व्यवसाय करायचा आहे? पण कोणता करावा हेच सुचत नाही? आजच्या वेळामध्ये मी तुम्हाला व्यवसाय करायचा कल्पना आयडियाज कशा शोधायच्या त्याच्या तीन पद्धती सांगणार आहे.
पुढील तीन पद्धती वापरून नफा देणारा व्यवसाय कसा निवडायचा हे तुम्हाला समजेल. प्रत्येक पद्धत ही उदाहरना सोबत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडला सोपे जाईल.
1.तुमच्या आजूबाजूला कोण-कोणत्या समस्या आहेत? याची यादी बनवा..
जगामध्ये जास्त करून व्यवसायाच्या कल्पना ही पद्धत वापरून शोधले गेले. तिथे तुम्हाला जागृत राहून हे पहावे लागेल, की तुमच्या गावात, शहरात लोकांना कोणकोणत्या समस्या आहेत. तुम्हाला त्या सर्व समस्यांची यादी बनवायचे आहे. आणि शांतपणे विचार करून तुम्हाला हे बघायचे आहे. की तुम्ही लोकांची कोणती समस्या सोडवू शकता. असे केल्याने तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी अनेक नवीन कल्पना सुचतील.
उदाहरण : मुंबईमध्ये रस्त्यावर किती ट्राफिक असते हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. तासन्तास ट्राफिक मध्ये अडकलेली असतात मुंबईत राहणाऱ्या एका युवकाला कल्पना सुचली, त्याने विचार केला तेव्हा पब्लिक ट्राफिक मध्ये एवढा वेळ असते. तेव्हा त्यांना भूक लागत असेल या युवकाला व्यवसायाची संधी दिसली. त्याने जिथे मुंबईमध्ये सर्वात जास्त ट्राफिक असते तिथे वडापाव आणि पाण्याचे बाटली विकायला सुरुवात केली. आज त्याचा व्यवसाय जोरात चालू आहे.
सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्हाला समस्या शोधून त्यावर उपाय शोधायचा आहे व त्याला व्यवसायाचे स्वरूप द्यायचे आहे.
2.चालू असणारे व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे करू शकतो ?
ही एक व्यवसाय शोधण्याची एक जबरदस्त पद्धत आहे. अनेक लोकांना वाटते जगामध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय चालणार नाही. पण इथे सुद्धा तुम्ही सतर्क राहून बारकाईने जे चालू असलेले व्यवसाय आहे. त्यांचे अवलोकन करा आणि त्याचा व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे कसे करता येतील याचा विचार करा. तुम्हाला हे बघायचे सर्वात जास्त चालणारा कोणता व्यवसाय आहे. आणि कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले व्यवसाय आहे. तुम्हाला मी तर म्हणालो की चहाची टपरी या व्यवसायाबद्दल तुमचे काय मत आहे? तर तुमच्यापैकी अनेक उत्तर देतील की जागोजागी चहाची टपरी आहे.
उदाहरण : काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये दोन युवकांना कल्पना सुचली. त्यांनी बाजारामध्ये तंदूर चहा हे नवीन चहाचा ब्रॅंड आणला. एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. लोक लांबून चहा प्यायला यायला लागली. आज त्यान ची पुण्यामुंबई मध्ये 50 पेक्षा जास्त दुकान आहेत .
3.हे शक्य आहे का ?
हे शक्य आहे का ? ही पद्धत पहिल्या दोन पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. या पद्धती मध्ये तुम्हाला असाव्यवसाय निर्माण करायचा आहे.
जो आतापर्यंत कोणी केलेला नाही. पण जगाला याची गरज सर्वात जास्त आहे.
आज पर्यन्त अनेकव्यवसाय या पडतही मुळे उदयास आले आहेत. मोबाइल चा शोध , विमानाचा शोध ,रेल्वे चा शोध आशे भरपूर आहेत . जे ह्या पद्धती मुळे शक्य झाले आहेत.
सुरवातीला या सगळ्या गोष्टी अश्याकया वाटत होत्या. हे शक्य आहे का ? या पद्धती मुळे त्या गोष्टी शक्य झाल्या. पण ही पद्धत थोडी अवघड आहे यासाठी प्रचंड बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. पण कष्ट केल्याशिवाय कोणी उद्योजक होऊ शकत नाही.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त युवा उद्योजकांपरेनत पोहचवा , कदाचित ही पद्धत वापरुन मराठी माणूस ही , अंबानी ,अदानी यांना टक्कर देऊ शकेल. धन्यवाद!!!!!!