प्रतिनिधी; सुधीर पाटील,
सांगली: सांगलीवाडी येथील माझी नगरसेवक हरिदास पाटील यानी महापुराच्या पाश्र्वभूमीवर सुरू केलेल्या,जयंत रेस्क्यू फोर्सचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडले.
सांगलीवाडीतील शंकर घाट येथे झालेल्या कार्यक्रमाला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस,
माजी महापौर सुरेश पाटील ,नगरसेवक विष्णू माने, राहुल पवार आदी उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी कृष्णा नदीतून होडीतून मधून फेरफटका मारला.