कराड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

< 1 Minutes Read

कराड : कुलदीप मोहिते
राज्यात हवामान खात्याने तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे

बुधवार संध्याकाळपासूनच कराड तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच नदी-नाले ओसंडून वहात आहेत प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे एक जून नंतर कराड तालुक्यात प्रथमच अतिवृष्टीची नोंद झाली आहे अजूनही पावसाचा जोर कायम आहे कराड तालुक्यात सरासरी 88.7 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून गुरुवारी सकाळी आठनंतरही पावसाचा जोर कायम आहे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.


तालुक्यातील कराड मंडल विभागात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कराड 95.00 मिलिमीटर, मलकापूर मंडल विभागात 93.00 मिलिमीटर, सैदापूर मंडल विभागात 90.00 मिलिमीटर, कोपर्डे हवेली मंडल विभागात 98.00 मिलिमीटर, मसुर मंडल विभागात 75.00 मिलिमीटर, उंब्रज मंडल विभागात 85.00 मिलीमीटर, शेणोली मंडल विभागात 88.00 मिलिमीटर, कवठे मंडल विभागात 82.00 मिलिमीटर, काले मंडल विभागात 80.00 मिलिमीटर, कोळे मंडल विभागात 87.00 मिलिमीटर, उंडाळे मंडल विभागात 85.00 मिलिमीटर, सुपने मंडल विभागात 99.00 मिलिमीटर आणि इंदोली मंडल विभागाचा 88.00 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील सर्व मंडल विभागात एकूण 1145.00 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 88.07 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *