कुलदीप मोहिते. कराड,
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव( उंब्रज) ता कराड येथे कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने साई मेडिकल फाउंडेशन चारीटेबल ट्रस्ट उंब्रज व विनायकराव पाटील जनसेवा संघटना वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना वडगाव वि का स सोसायटी येथे संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज दादा पाटील संचालक सर्जेराव खंडाईत रणजीत पाटील कार्याध्यक्ष सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र संभाजीराव कदम प्राध्यापक दिलीप कुमार मोहिते ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश दादा मोहिते शंकर जाधव अनिल कदम नामदेव कदम सोसायटीचे चेअरमन शांताराम कदम कृष्णत जाधव मदन सुतार भरत कदम जावेद मुल्ला इत्यादी मान्यवर तसेच वडगाव ग्रामस्थ उपस्थित होते