निवडणूका झाल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ: सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री.

< 1 Minutes Read

सलग 18 दिवसानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर 12 पैशांवरून 15 पैसे केले आहेत. तर डिझेल 18 पैशांनी महागले आहे. यापूर्वी 15 एप्रिल रोजी महागड्या पेट्रोल आणि डिझेलमधून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल अजूनही प्रति बॅरल 66 डॉलरच्या वर आहे. कच्चे तेल कित्येक आठवड्यांपासून कमतरता दर्शवित आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर वरून कमी होऊन 63 डॉलर प्रति बॅरलवर गेली. पण आता ती वेगात परतत आहे.

दिल्लीत पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोल 96.83 रुपयांवरुन 96.95 रुपये झाले आहे. तर डिझेल 87.81 रुपयांवरून 87.98 रुपयांवर गेले आहे.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *