विद्यापीठाच्या परीक्षा 10 एप्रिल पासून सुरू झाले असून आत्तापर्यंत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पकडले आहे. एकाच दिवशी ७४ विद्यार्थी कॉपी करताना विद्यापीठाच्या प्राॅक्टर्ड यंत्रणेने शोधले आहे. त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे काही विद्यार्थी ग्रुप करून ऑनलाइन परीक्षा देत असल्याचे आढळून आले आहे.
तसेच काही विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे पाठवत असल्याचे समोर आले आहे.विद्यार्थ्यानी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ग्रुप्स उगढून परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नाची देवाण घेवाण सुरू आहे. बरेच विद्यार्थी इंटरनेटवर उत्तरे शोधत असल्याचे आढळले, इतरांनी प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो इतरांना उत्तरासाठी पाठवला तर काही विद्यार्थी गटात बसून परीक्षा देत आहेत.
विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान सुमारे दीडशे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. विद्यापीठाच्या इमेज प्रॉक्टर्ड यंत्रणेतून या विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांना विद्यापीठाच्या तक्रार समिती समोर उभे केले जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू असल्या तरी गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाचे लक्ष आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असून त्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या यंत्रणेतून सुटत नाहीत – महेश काकडे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ