जर तुम्ही PhonePe पेमेंट अॅपद्वारे व्यवहार करत असाल तर जाणून घ्या..
वॉलमार्ट ग्रुपची डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने 50 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाईल रिचार्जसाठी प्रति व्यवहार 1-2 रुपये शुल्क आकारणे सुरू केले आहे. व्यवहारांसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करणारे Phonepe हे पहिले डिजिटल पेमेंट अॅप आहे. ही सेवा त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून मोफत दिली जात आहे.
इतर कंपन्यांप्रमाणे, PhonePe देखील क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी प्रक्रिया शुल्क आकारत आहे. फोनपेच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही रिचार्ज संदर्भात छोट्या प्रमाणावर प्रयोग करत आहोत. या अंतर्गत काही वापरकर्ते मोबाईल रिचार्जसाठी पैसे देत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क नाही, 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये आणि 100 रुपयांच्या वरच्या रिचार्जवर 2 रुपये शुल्क आहे.
व्यवहारांच्या बाबतीत फोनपेचा सर्वाधिक वाटा आहे. कंपनीने सप्टेंबरमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटी UPI व्यवहारांची नोंद केली होती.
50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर शुल्क आकारले जात नाही, 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जसाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जसाठी 2 रुपये आकारले जातात.