मिलिंदा पवार खटाव:-( वडूज) सातारा,
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वडूज शाखेच्या वास्तू च्या भूमिपूजनाचा समारंभ मा. ना.बाळासाहेब पाटील (पालकमंत्री सातारा जिल्हा तथा सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
अतिथी म्हणून राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी जी राजयोगी ब्रह्माकुमार दशरथ भाई जी( झोनल कॉर्डिनेटर ग्रामविकास प्रभाग महाराष्ट्र)
पुणे क्षेत्रीय संचालिका मा. जनार्दन कासार (परीक्षा विधीन उपजिल्हाधिकारी, खटाव) मा. शैलेश सुर्यंवशी( उप विभागीय अधिकारी माण-खटाव) मा. किरण जमदाडे (तहसिलदार खटाव), मा.डॉ. निलेश देशमुख ( उपविभागीय पोलीस अधिकारी) मा. माधव खांडेकर( मुख्याधिकारी वडूज न. पं.)मा.शहाजी देसाई (उप अभियंता सा.बां. वडूज मा. धनाजी राव खाडे ( दुय्यम निबंधक), मा. सी.आर. गोडसे( अध्यक्ष प्राचार्य संघटना कोल्हापूर जिल्हा मा. डॉ.विनोद खाडे (पत्रकार)प्रमुख उपस्थिती मा. प्रा. बंडा गोडसे ( जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस )मा. जयश्री कदम – पाटील (सभापती पं. स खटाव ) मा . संदिपजी मांडवे ( मा.सभापती पं.स. खटाव ) मा. सुनिल गोडसे ( नगराध्यक्ष नगरपंचायत वडूज ) मा. विजय काळे ( मा. सभापती कृ.उ.बा.स.) मा. एम.एस. गोडसे( चेअरमन वडूज वि.का.स. सोसा.) मा. सचिनशे ठ माळी आर्किटेक्ट ) (संचालक जिल्हा मजूर फेडरेशन ) मा. हरिदास जाधव (सुधीर फर्निचर वडूज )
मा. धनंजय क्षीरसागर (पत्रकार) मा. गणेश गोडसे मा.बाळासाहेब पाटील म्हणाले की समाजामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न अडचणी असतात व त्यामधून लोकांना शांतीचा मार्ग हवा असतो व एक चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करण्यासाठी हे विश्व विद्यालय अतिशय उपयोगी पडणार आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाचा उद्देश आहे की चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करणे.१९८६ चा युनोने एक प्रोजेक्ट राबवला होता’ मिलियन मिनिट्स ऑफ पीस ‘त्यामध्ये या विद्याल याला’ इंटरनॅशनल पीस मेसेंजर’ अवार्ड मिळाले आहे.