पुणे येथील मुळशी उरवडे रासायनिक कंपनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत पोहचविण्यात यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

< 1 Minutes Read

सुरक्षा मानकांचा, उपाययोजनांचा आढावा घेण्याचे निर्देश

ता 9. पुणे : पुणे जिल्ह्यातील उरवडे (ता. मुळशी) येथील रासायनिक कंपनीतील स्फोट आणि आगीतील मृत्यूप्रकरणी औद्योगीक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने पाठपुरावा घेण्यात यावा. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उरवडेतील या रासायनिक कंपनीतील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीनेही सर्वंकष चौकशीनंतर तातडीने अहवाल सादर करावा. मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करून, लवकरात लवकर सबंधितांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.

औद्योगीक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांबाबत औद्योगीक सुरक्षा मानकांचा वारंवार पाठपुरावा घेण्यात यावा. सुरक्षा उपाययोजनांबाबत, तसेच नियमांच उलंघन करणाऱ्या उद्योंगावर कारवाई करण्यात यावी. सुरक्षा उपाययोजनांतील कांतरतेमुळे व अडचणींमुळे जीवितहानी होऊ नये याबाबत कठोरपणे पावले उचलण्यात यावीत, असेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *