कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना अखेर महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची मोठी घोषणा केली.
- उद्या संध्यकाळपासून ब्रेक द चेन या मोहिमेतर्गत 144 कलम लागू.
- अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये : मुख्यमंत्री.
- राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144 लागू होणार.
- सर्व आस्थापना बंद राहतील व सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही… त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच.
- अनावश्यक ये-जा बंद; अत्यावश्यक आणि योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
- अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहणार
- पार्सल सेवा सुरू राहणार, हॉटेल्स बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू तर रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार, लोकल ट्रेन आणि बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार
- पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल. तर हवाई मार्गे ऑक्सिजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी.
- कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पस मध्येच कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी तर सेबी, पेट्रोलियन, आयटी कार्गो सेवा सुरू राहणार.
- रुग्णालये, मेडीकल, लस उत्पादक, वाहने, मास्क इत्यादि सुरु.
- राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत.
- शिवभोजन थाळी 10 रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर 5 रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत.
- कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत 1500 रुपये प्रत्येकी.
- राज्यसरकराकडून अन्न सुरक्षा योजनेतर्गत लाभार्त्यांना पुढील एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ (प्रत्येकी)
- पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत
- कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत 1500 रुपये प्रत्येक
- अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये..
- परवानधारक रिकशाचालक प्रत्येकी 1500 रुपये
- आदिवासी कुटुंबाना एक वेळचे 2000 रुपये
- 3 हजार 300 कोटी फक्त कोविड साठी
- निर्बंधांच्याकाळात आरोग्य सुविधांकरिता स्थानिक प्रशासनासाठी 3 हजार 300 कोटी निधी बाजूला काढला आहे.