मिलिंद लोहार सातारा कराड
दिनांक 28 फेब्रुवारी
साई मेडिकल फाउंडेशन & चारीटेबल ट्रस्ट नेहमीच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असतो यावेळी निमित्त होतं ग्रामीण भागातून आलेल्या
आनंदपूर (उंब्रज) ता.कराड चे सुपुत्र मा. श्री.सुनिल एकनाथ बाबर यांची भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार म्हणून पदोन्नती झाले बद्दल त्यांचा सत्काराचे सुनील एकनाथ बाबर यांची भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार पदी पदोन्नती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश मोहिते यांच्या वतीने करण्यात आला या सत्कार सोहळ्यात सुभेदार बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते अत्यंत खडतर परिस्थितीतून 1995 साली भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाल्या पासून आजअखेर गेली 27 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये आसाम,पंजाब,पुणे,व त्यानंतर त्यांनी कारगील व सध्या उत्तर प्रदेश येथील अनुभव कथन केले.
यावेळी साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेशदादा मोहिते यांनी भारतीय सीमेवर जवान सतर्क असल्यामुळेच आम्ही भारतीय सुरक्षित आहोत हे अभिमानाने सांगीतले यावेळी उपस्थित सुनील पवार, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शिवाजीनगर (उंब्रज), अशोक भिलारे, सतीश साळुंखे, शिवाजी जाधव व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.