प्रतिनिधी: मिलिंद लोहार सातारा
सातारा पोलिस दलातील पोलिसांना दिवस आणि रात्र गस्तीसाठी वाहनांची आवश्यकता ओळखून सातारा जिल्हा नियोजन निधीतून साडे 3 कोटी रुपयांच्या 24 चारचाकी तर 48 दुचाकी वाहने आज सातारा पोलीस दलाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आली आहेत. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि पीडितांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ‘डायल 112’ ही संकल्पना महाराष्ट्र पोलीस दलाकडून राबविण्यात येते. या मोहिमेच्या अंतर्गत सातारा पोलीस दलाला आज ही वाहने सुपूर्द करण्यात आली आहेत.
सातारा पोलीस दलातील बंधू-भगिनींना ही वाहने दिवस आणि रात्रीच्या गस्तीसाठी उपयोगी पडणार असून शहरातील व जिल्ह्यातील अडीचशे ठिकाणी क्यूआर कोड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी जाऊन गस्तीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर स्कॅनर स्कॅन करून त्यांच्या गस्तीसंदर्भातील माहिती मुख्य कार्यालयामध्ये पोहचवली जाते.

शहर आणि जिल्ह्यात कुठेही एखादी अनुचित घटना घडत असेल तिथे तात्काळ पोलिसांना दाखल होण्यासाठी आणि पीडित व्यक्तीला वेळेत तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही वाहने आज प्रदान करण्यात आली आहेत.
पोलीस विभागातील अनेक वाहने जुनी झाली होती. जिल्हा नियोजनच्या निधीमधून 13 स्कॉर्पिओ, 5 बलोरो, 6 व्हॅन व 48 मोटार सायकली पोलीस विभागास देण्यात आली आहेत. या वाहनांचा बंदोबस्तासाठी मोठा उपयोग होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मिदत मिळणार आहे तसेच
या वाहनांचा पोलीस विभागामार्फत योग्य उपयोग करुन पोलीसांमधील कार्यक्षमता व गतीमानता वाढणार असून, हा निधी मंजुर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आम्ही आभार व्यक्त करतो.