राज्यात लवकरच 5200 पदांसाठी मेगा भरती होणार; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा…
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Maharashtra Police Bharti 2021 | Police Shipai Bharti 2021
काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ?
Maharashtra Police Bharti 2021 महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील 5,200 पदांची भरती या वर्षाअखेरीस 31 डिसेंबर पूर्वी केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.तर त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 7 हजार पदांची पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. दरम्यान, पोलीस दलातील भरतीसोबतच कोविडमध्ये मृत पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरण हि गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
मृत कर्मचाऱ्याच्या पाल्याला नोकरी
कोविडमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचं धोरण स्पष्ट आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.50 लाख देण्याचं काम पूर्ण झालं आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली. Maharashtra Police Bharti 2021