छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) परिवार सातारा तर्फे शिवतीर्थ पोवई नाका सातारा येथे दीपोत्सवाचे आयोजन

निमित्त होतं दिवाळीचं छत्रपती मराठा साम्राज्य (cms) सातारा परिवारातर्फे दीपोत्सव सोहळा मराठ्यांची पाचवी राजधानी सातारा मधील शिवतीर्थ पो वई नाका सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर “एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी” या ब्रीद वाक्य खाली दि. 5/11/2021 वार शुक्रवार रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती मराठा साम्राज्य सातारा,(cms) परिवारातर्फे शिव तीर्थाच्या आजूबाजूची साफसफाई करण्यात आली. फुलाची रांगोळी काढण्यात आली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून 1001 दिवे लावण्यात आले सर्व बुरुजांवर 200 ज्योत तेवत ठेवण्यात आल्या.

Share For Others