प्रतिनिधी:राम जळकोटे,उमरगा,
शहर तालुका परिसरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवून लसीकरणासाठी लोकांचा रुग्णालयात रांगा लागत आहेत या मुळे, या ठिकाणी नागरिकांना उन्हात उभे रहावे लागत होते, याबरोबरच बसण्याची व्यवस्था नव्हती. नागरिकांना आसनाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणीच वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक बडे आणि डॉ विक्रम आळगेकर यांनी केल्यानंतर लागलीच ४० × ५० आणि १० × ५० असे दोन ग्रीन शेड उभा करण्यात आले आहेत यासोबत तसेच ६० खुर्च्यांची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.
यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने साहेब डॉ विक्रम आळगेकर डॉ प्रवीण जगताप, डॉ संदीप फोफले, डॉ सोमनाथ कवठे, डॉ पद्माकर घोगे, सिद्धेश्वर माने, अमोल पवार, संतोष कांबळे, संदीप वाघमारे, सौ. शोभा तुरोरे, सौ.अफसर तांबोळी, सौ. मंगल भालेराव, सुभद्रा गाढवे आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, भानुदास बोरूले, शैलेश नागणे, सिद्धू दुधभाते, सुमित घोटाळे, आदी सह स्वंयसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते !