उंब्रज व परिसरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस स्टेशन उंब्रज व ग्रामपंचायत उंब्रज यांची कोरोना चाचण्यांची धडक मोहीम
कुलदीप मोहिते उंब्रज( कराड)
दिनांक 15 जून
सध्या सातारा जिल्ह्यामधील कोरोना ची आकडेवारी चा वेग थोडासा मंदावला असला तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये काही अंशता लॉकडाउन मध्ये शिथिलता दिल्यामुळे बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज, पोलिस स्टेशन उंब्रज ,आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्त रित्या उंब्रज बाजार पेठ मधील लोकांच्या rat आणि R tpcr तपासण्या केल्या या मध्ये एकूण 6 जण बाधित सापडले, गेल्या काही दिवसापासून काही अंशी बाजारपेठ खुल्या करण्यात आल्या उंब्रज हे मध्यवर्ती ठिकाण असून उंब्रज आणि परिसरातून येथे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यात विनाकारण फिरणारे ही आहेत त्यामुळे कोरोना संसर्ग मध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज पोलीस स्टेशन उंब्रज ग्रामपंचायत यांनी दुकानदारांची Rat तपासणी केली यामध्ये 126 जणांची Rat तपासणी केली, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज मध्ये ही सुमारे 15 जणांची Rat आणि 14 जणांची Rtpcr केली अशा एकूण 155 तपासणी मध्ये एकूण 6 जण बाधित सापडले. यातून कोरोना संसर्गाची तीव्रता दिसून येते त्यामुळे उंब्रज परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि दुकानातील कामगारांनी आपली तपासणी करून घ्यावी तसेच अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस स्टेशन उंब्रज यांचे वतीने करण्यात आले. या वेळी उंब्रज पोलीस, स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड पोलीस कर्मचारी ग्रामसेवक उंब्रज आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज चे वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते