उंब्रज,सातारच्या तरुणीची गरुड झेप

< 1 Minutes Read

प्रतिनिधी : मिलिंद लोहार,सातारा.

सातारा:जागतिक किर्तीचे कॅन्सर तज्ञ डाॅ. उन्मेष मोहिते यांची कन्या कु किमया उन्मेष मोहिते,हिला जगातील नामांकीत Bristol University Medical College (U.K.) मध्ये (MBChB) Bachelor of Medicine and Bachelor of Surgery degrees ला ॲडमिशन मिळाले.

तिला जगातील सर्वात नामांकीत अशा King’s College लंडन, व Cardiff university Medical college या तिन्ही ठिकाणी ॲडमिशन साठी तिचे Selection झाले त्या तिन्ही ठिकाणी Selection होणारी ती एकमेव विद्यार्थी ठरली. त्यातुन तीने जगातील सर्वात नामांकीत अशा Bristol University Medical college ला ॲडमिशन मिळवले. लहानपणापासुनच आई वडीलां प्रमाणे डाॅक्टर होऊन रूग्ण सेवा करायची हे ध्येय तिने ठरवुन तिने अभ्यासात परिश्रम घेतले,त्यासाठी तिने शिक्षण घेत असताना इंग्लंड मधील विविध कॅन्सर,बालरोग,स्त्रीरोग,व इंग्लंड मधील (Gereatic) जेष्ठ नागरिक हाॅस्पिटल ना स्वयंसेवक म्हणून काम केले व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या व शिक्षणामध्ये उच्चगुणवत्ता प्राप्त करुन व इंग्लंड मधील मेडिकल कॉलेज च्या अत्यंत अवघड अशा मुलाखती मधुन तिची निवड झाली.

किमया अभ्यासाबरोबरच तिने इंग्लंड मधील इतर खेळामध्ये सुद्धा तिने विशेष प्राविन्य मिळवले आहे. तिला तिचे वडील डाॅ. उन्मेष मोहिते व आई डाॅ. श्वेता उन्मेष मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले, आजोबा व मुख्याध्यापक कै.श्रीरंगराव गणपती मोहिते (सर) यांची व आज्जी नंदिनी श्रीरंगराव मोहिते यांची शिकवण. उंब्रज येथील साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शैलेश मोहिते व श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र व कौन्सिलींग सेंटर च्या अध्यक्षा सौ अश्लेषा शैलेश मोहिते,व आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी नितेष मोहिते व सौ. आरतीे नितेष मोहिते यांची ती पुतणी आहे.

संपूर्ण मोहिते परिवार उच्चशिक्षित असुन समाजकार्यात सक्रीय असतात, या तिच्या यशाबद्दल विविध राजकीय व सामाजिक तसेच मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकारी र्यांनी तिचे अभिनंदन केले व भारताची मान परदेशात उंचावणारया किमया ला शुभेच्छा दिल्या !!! आई वडिलां प्रमाणेच तुही उत्तुंग भरारी घे व नांवाप्रमाणेच किमया कर यांच तिला जगभरातून शुभेच्छा देण्यात आल्या !!! निश्चितच तिच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याची मान उंचावली आहे

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *