ज्येष्ठ दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज ऑटो कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या वयामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
1972 पासून राहुल बजाज यांनी बजाज ऑटोचा कारभार सांभाळत होते. तब्बल 49 वर्षे सेवा दिल्यानंतर राहुल बजाज यांनी राजीनामा दिली आहे. शुक्रवारी राहुल बजाज यांचा अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस असेल. राहुल बजाज यांच्या जागी बजाज कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीरज बजाज हे कंपनीचे नवीन अध्यक्ष असण्याची शक्यता आहे.
1 मे पासून बजाज ऑटो कंपनीचा सर्व कारभार नीरज बजाज यांच्या हाती येऊ शकतात. तर गेल्या पाच दशकांपासून राहुल बजाज यांनी कंपनी आणि ग्रुपच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राहुल बजाज यांनी देशातील दुचाकी आणि चारचाकी मॉडेल त्यांनी भारतातच नाही तर परदेशातही यशस्वी करुन दाखवले. कंपनीतील सर्वांसाठी ते आदर्श असून नव्या पिढीला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाव्यात यासाठी 1 मे पासून पुढील 5 वर्षांसाठी राहुल बजाज यांना मानद चेअरमन पद देण्यात आले आहे.
राहुल बजाज यांचे ऑटो क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे. त्या काळात बाजारात मोठी स्पर्धा असताना त्यांनी मोटारसायकलच्या दुनियेत स्कूटरला एक दर्जा मिळवून दिला. दरम्यान, राहुल बजाज हे याआधी राज्यसभेच सदस्य होऊन गेले आहेत. तर त्याचबरोबर देशातील तिसरा सर्वोच्च नागरी म्हणून त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.