पाणी अडवा, पाणी जिरवा…

< 1 Minutes Read

Save Water Save Life | पाणी अडवा, पाणी जिरवा

आजच्या या जगात कोणाला कशाची कहीच गरज वाटत नाही . जो तो आपल्याच धुंदीत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला पाण्याचे महत्त्व पटवून देणार आहे. मित्रांनो आपल्याला लहानपासूनच आपल्या आई-बाबांनी, शिक्षकांनी आपल्याला हे सांगितलंच आहे ना, की अन्न, हवा ,वस्त्र, निवारा या आपल्या जीवनावश्यक गोष्टी आहेत.

तर या सगळ्या गोष्टींना नियमित आकार दिला पाहिजे नि त्यांचा आदर करायला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या जीवनाला एक वळण दिलं पाहिजे.
आणि या गोष्टी आपल्यासाठीच असतात आपल्या जीवनासाठी, आपल्या आयुष्यासाठी या नेहमी आपल्या सोबत असतात, तर आपण यांचा निट वापर
केला पाहिजे, मगच या गोष्टी सुध्दा आपला आदर करतील.

Save Water Blog Save Lifes marathi mentor

आपण म्हणतो, की मला मोठ आलिशान घर पाहिजे, पण जर तुम्हाला तस घर मिळलंही, पण तुम्ही त्याची निगा नको राखायला त्याला निट नको ठेवायला,आणि साफ नको करायला . आणि तुम्हांला नवीन, सुंदर वस्त्र पाहिजे असतील, आणि ते तुम्हाला मिळालेही, पण तुम्ही त्यांना निट, साफसूत्र नको ठेवायला, नको त्यांना धुवायला, तर ते पण तुम्हाला साडून लगेच जातील.

तुम्हांला जेवायला पण बर्गर, पॅटिस पाहिजे, हे जर हानिकारक गोष्टी तुम्ही सारखे खात असाल तर तुमच सुंदर शरीरही तुम्हांला सोडून जाईल. तुम्ही म्हणता की शहराची हवा शुद्ध नसते, अरे पण आतातर तुम्ही गावाची हवा सुद्धा अशुद्ध करायला निघालायत कुठेही बघितलं तरी कचराच – कचरा .त्यामुळे नदीच पाणी , नाले अशुद्धच.

Save Water Blog Save Lifes marathi mentor
Save Water Save Life

तर आता आपण पाण्याबद्दल बोलू, आपल्याला जश्या अन्न, वस्त्र निवाश, हवा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तश्याच इतरही गोष्टी असतात,
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पाणी’. पाणी हे आपल्या जीवनाच्या आपल्या जगण्याला पाणी मोठं महत्त्वाच आहे जर आपल्याजवळ पाणीच नसत ,
तर आपण काय नुसतं कोरड अन्न खाल्ल असत , जेवण बनवायला सुद्धा पाण्याचीच आवश्यकता असते.

आपण जर पाणी शुद्ध पित नसतो, तर आपल्याला अनेक रोग झाले असते, आपण नेहमी आजारी पडू शकतो. पण या यंत्र-तंत्राच्या युगात
सगळ्यांकडे फिल्टर्स आहेत. सगळे शुद्धच पाणी पित असावेत. पण त्या गोरगरीबांन्य काय? ते अळणी जेवण खातात अशुद्ध पाणी पितात .
खेड्याकडे त्याच बाया नदीवर कपडे धुतात, गायी-म्हशींची अंघोळ घालतात आणि तेच पाणी पितात, त्यामुळे खेडे गावाकडे रोगी जास्त असतात.

Save Water Blog Save Lifes marathi mentor

आपण पाण्याचा कधीच आदर करत नाही. पाण्याचा गलास घेतो, पाणी पितो आणि उरलं पाणी फेकून देतो. कधी-कधी नळ तसाच चालू राहतो
त्यामुळे किती पाण्याचा नासोळा होतो. त्यामुळे आपण नियमित पाणी प्या,पाण्याचा नास-नासोळा न करता,जेवढ हवय तेवढच पाणी पिऊन,
पाण्याचा नासोळा होण्यापासून वाचवा.

तुम्हींच पाण्याचा नासोळा करसाल, तर एखादया वेळेस पाणीही तुमचा नासोळा करू शकतो, त्यामुळे सर्वांनीच हे घोषवाक्य लक्षात ठेवा की,

पाणी अडवा पाणी जिरवा !…..

Save Water Save Life

Read This One:-
स्टेशनरी दुकान व्यवसाय कसा सुरू करावा
भारतातील 10 प्रेरक वक्ते | Indias Top 10 Motivational Speakers
तुमच्या जीवनात ऊर्जा आणण्यासाठी ह्या सवयी खूप उपयुक्त ठरतील..

Join Us

Share For Others

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *